जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

जांबूत गावच्या तरूणाचा पाण्यात जलयोग; कोरोनाकाळात योगाचा करतोय प्रसार प्रचार!


 

सोलापूर : कोरोना काळात प्रत्येकाला आरोग्याचं महत्त्व समजून आले. श्वसनसंस्था मजबूत करण्यासाठी डॉक्टरांनी प्रत्येकाला योगासने करावे, असे आवाहन करत होते. त्यामुळे अनेकांनी आपले पावले योगाकडे वळवली. दरम्यान, एका युवकाने डॉक्टरांचा हा सल्ला मनावर घेत हटके पध्दतीने पाण्यात जलयोग करण्यास सुरूवात केली. त्याचा हा हटके जलयोग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. बाळासाहेब सरोदे असे या युवकाचे नाव आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबूत गावच्या शरदवाडी येथे राहणारा २८ वर्षीय बाळासाहेब हा पेशाने एक शिक्षक आहे. एमएस्सी बीडचा शिक्षण घेतलेला बाळासाहेब हा पुण्यात खाजगी क्लासेस चालवतो. कोरोनामुळं लॉकडाऊन लागू झाले अाणि तो गावाकडे परतला. लॉकडाउन काळात त्यांच्याकडे बराच वेळ असल्याने त्याचा हा वेळ तो व्यायामासाठी देऊ लागला. शरीराने धष्टपुष्ट असलेल्या बाळासाहेबला जिममध्ये जाऊन शारीरिक कसरती करणे प्रचंड आवडायचे. मात्र लॉकडाऊनमुळे तेही बंद त्यामुळे त्याने योगा करण्यावर भर दिला.

योग करायचा तो पण हटके असा विचार त्याच्या डोक्यात आला. बाळासाहेब ने यापूर्वी पाण्यात जलयोग करतात हे ऐकले होते. तसाच जलयोग करण्याचे त्यानेही निश्चय केला. यासाठी योगासने कसं करतात? हे तो यूट्यूबवर व्हिडिओ पाहू लागला. अवघ्या तीन महिन्यांत तो संपूर्ण योगासने शिकून घेतला. योगसने करत असताना जमिनीपेक्षा पाण्यात जास्त ऑक्सिजन मिळते याचीही त्यांना जाणीव झाली. म्हणून तो पाण्यात जलयोग करण्याचे ठरवले. गावाजवळ असलेल्या कुकडी नदीवर तो रोज सकाळ-संध्याकाळ चार ते पाच तास याचा सराव करू लागला.

Advertisement -

योगा

अवघ्या काही महिन्यांतच त्याने ही कला आत्मसात केली. गावातील कुकडी नदीच्या पाण्यात तो भुजंगासन, अर्धचक्रासन, वक्रासन, सेतुबंधासन, मत्स्यासन, शीर्षासन, धनुरासन, शवासन, ताडासन अशी विविध योगासने अगदी सहजरित्या करतो.
लॉकडाऊनमध्ये त्याने केलेले जलयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतायत. याशिवाय कोरोनाकाळात योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी तो कोरोना सेंटरमध्ये जाऊन लोकांना योगाचे धडे देतोय शिवाय विविध सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित योगाविषयी व्याख्याने देतोय. त्याने योगाचा सर्टिफिकेट कोर्स देखील पूर्ण केला आहे. काहीजणांना तो ऑनलाईन योगासनाचे धडे देतोय.

व्यायाम करा आरोग्याची चिंता मिटेल.

पाण्यातील योगासनांमुळे आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. नदीच्या परिसरात ताजी हवा आणि शांत वातावरण असते. सकाळच्या वेळी येथील हवेत मुबलक प्रमाणात ऑक्सिजन असल्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते. तरुण वयात व्यायाम जास्त केल्यास चाळिशीनंतर आपल्याला आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणार नाहीत. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन वेळेतला काही वेळ हा व्यायामासाठी राखून ठेवावा. जेणेकरून आपल्याला डॉक्टरांकडे जास्त जावे लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here