जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

बिग बॉस फेम अभिनेत्रीचा दिल्लीत अपघात, हॉस्पिटलमध्ये झाली भरती…


बिग बॉस फेम अभिनेत्री अर्शी खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.कार अपघातात ती गंभीर जखमी झाली होती, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार दिल्लीतील मालवीय नगर भागात सोमवारी हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अर्शीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तिच्या अपघाताची बातमी समजताच चाहते सोशल मीडियावर अर्शीला तिची प्रकृती विचारत आहेत आणि तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघात झाला तेव्हा अर्शी खान तिच्या मर्सिडीज कारमध्ये होती. दिल्लीतील मालवीय नगरजवळ शिवालिक रोडवर हा अपघात झाला. यावेळी त्यांचा सहाय्यकही त्यांच्यासोबत होता. असे सांगितले जात आहे की कारची धडक लागताच एअरबॅग उघडल्या, ज्यामुळे ती गंभीर जखमी होण्यापासून वाचली. मात्र, छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अर्शी शूटिंगच्या निमित्ताने दिल्लीला गेली होती.

अभिनेत्री

2017 मध्ये ‘बिग बॉस’च्या 11व्या सीझनमधून अर्शी पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली होती. यानंतर ती बिग बॉस 14 मध्ये चॅलेंजर म्हणून दिसली. शोमधून बाहेर पडताच अर्शीला दिग्दर्शक दुष्यंत सिंगच्या ‘त्राहिमम’ चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटात ती एका खेड्यातील मुलीची भूमिका साकारणार आहे.

Advertisement -

अर्शीची महत्त्वाकांक्षा बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची आहे. अर्शी खान ‘विश’ आणि ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. ती लवकरच टीव्हीवरील ‘आयेंगे तेरे सजना’ या स्वयंवर शोमध्ये दिसणार आहे. कामाव्यतिरिक्त अर्शी तिच्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावर तिच्या बोल्ड इमेजमुळे चर्चेत असते.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

 

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

 

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

 

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here