जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

 

एनसीबीच्या चौकशीत आर्यन खान तुटला, वडील शाहरुख खानसोबत दोन मिनिटे फोन कॉल वर रडला…..

 

 

Advertisement -

अभिनेता-शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने मुंबई-गोवा क्रूझमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टी प्रकरणात दीर्घ चौकशी केल्यानंतर अटक केली आहे. ड्रग्स प्रकरणी एनसीबीने आर्यन खानला रविवारी ताब्यात घेतले आणि त्याची सतत चौकशी केली जात आहे. चौकशी दरम्यान आर्यन स्वतःला आवरू शकला नाही आणि रडू लागला. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यनसोबत फोनवर बोलले.

 

 

आर्यन खान चौकशी दरम्यान सतत रडत होता :

मीडिया रिपोर्टनुसार, अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याचे वडील शाहरुख खानशी त्याच्या लँडलाईन फोनवरून दोन मिनिटे बोलण्यास सांगितले. या दरम्यान आर्यन सतत रडत राहिला. दुसरीकडे, बॉलिवूडचे अनेक स्टार्स शाहरुख खानला सपोर्ट करत आहेत. सलमान खान रात्री उशिरा शाहरुखच्या घरी मन्नतला पोहोचला, तर अनेक स्टार्सनी सोशल मीडियावरच शाहरुखला आपला पाठिंबा दर्शवला.

 

या प्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन व्यतिरिक्त, मुनमुन धामेचा आणि अरबाज सेठ मर्चंट यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना एक दिवसाच्या रिमांडवर एनसीबीच्या ताब्यात दिले आहे.

 

 

तत्पूर्वी, एनसीबीने त्यांच्याविरोधात आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, असे सांगत या तिघांना 5 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्याची न्यायालयाकडे मागणी केली. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की आर्यन खानला एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, अटकेनंतर आर्यनसह तिन्ही आरोपींना मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

 

 

एजन्सीचे प्रमुख एस.एन. प्रधान म्हणतात की एनसीबी बॉलिवूड कनेक्शनचाही विचार करत आहे. आम्ही अंमली पदार्थ टोळीचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आम्ही अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ तरुणांना मुंबईत क्रूझ शिपमधून ड्रग्सचा वापर आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

 

 

त्याचवेळी, हे प्रकरण समोर आल्यापासून, पुन्हा एकदा बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनचा मुद्दा चर्चेत आला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबी मनोरंजन उद्योगावर बारीक नजर ठेवून आहे आणि आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. अनेक स्टार्सनी जेलची हवाही खाल्ली आहे. मात्र, बातमीवर विश्वास ठेवला तर आर्यन खानला आज दिलासा मिळू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी आर्यन खानच्या नजरकैदेत वाढ करण्याची मागणी करणार नाहीत. त्याला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येईल, त्यानंतर आर्यन खानचे वकील जामिनासाठी अर्ज करतील. त्यांना येथून जामीन मिळण्याची शक्यता आहे.

 


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

 

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

 

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

 

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here