जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

शंभर कोटीची वसुली पडणार महाग? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक..!


खंडणी प्रकरणी मोठी कारवाई करत ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली. देशमुख यांची जवळपास 12 तास चौकशी चालली, ज्यात ईडीला त्यांच्या बाजूने कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

सोमवारी सकाळी ११.५५ वाजता अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात पोहोचले. याआधी ईडीच्या वतीने अनिल देशमुख यांना वारंवार समन्स पाठवण्यात आले होते, मात्र ते हजर होत नव्हते. त्यानंतर तब्बल 12 तास चौकशी चालली आणि अनिल देशमुखला अटक करण्यात आली.

अनिल देशमुख

 

Advertisement -

खरेतर अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता, पण आता परमबीर सिंग स्वतः कुठे आहेत, याचा कुणालाच पत्ता नाही. हे संपूर्ण प्रकरण मार्च महिन्यात समोर आले, जेव्हा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता.

अनिल देशमुख यांनी खंडणीच्या आरोपांनी घेरल्यानंतर 5 एप्रिल रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 10 मे रोजी ईडीने त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here