जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

माझ्या आईकडे दोन रुपये नसल्यामुळे संघातून मला हाकलून दिले होते, अमिताभ बच्चन यांनी भावूक होत सांगितला हा किस्सा…


मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या मेहनतीने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आज अमिताभ चित्रपटांमध्ये काम करतात किंवा टीव्हीमध्ये, त्यांना लोकांकडून खूप प्रेम मिळते. आज आम्ही तुम्हाला अमिताभच्या त्या कथेबद्दल सांगत आहोत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तसेच भावनिक देखील व्हाल.

ही गोष्ट आहे जेव्हा लहानपणी अमिताभ फक्त 2 रुपयांमुळे क्रिकेट खेळू शकले नव्हते.

शुटींग दरम्यान एका स्पर्धकाने आपल्या गरिबीचा उल्लेख करतांना क्रिकेटविषयीची किस्सा सांगितला होता जे ऐकून अमिताभ बच्चन भावूक झाले आणि त्यानाही त्यांच्या आयुष्यातील शाळेच्या वेळचा क्रिकेटशी जोडलेला एक किस्सा आठवला.

अमिताभ बच्चन

Advertisement -

स्पर्धकाची  गोष्ट ऐकून अमिताभ खूप भावूक झाले. त्याची कथा ऐकून त्यांना आपल्या लहानपणातील अशीच एक कथा आठवली. अमिताभ बच्चन यांनी किस्सा शेअर करतांना सांगितले की त्यांना शाळेत  क्रिकेट संघाचा एक भाग व्हायचे आहे आणि त्यासाठी  त्यावेळी 2 रुपयांची गरज होती.

जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा तिने सांगितले की तिच्याकडे शाळेच्या क्रिकेट संघाकडे पाठवण्यासाठी पैसे नाहीत. आणि क्रिकेट खेळणाऱ्या बाकी संघातील खेळाडूंनीही दोन रुपये न आणल्यामुळे अमिताभ बच्चन यांना संघातून हाकलू लावले होते. यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले की म्हणूनच मला आजही 2 रुपयांची किंमत खूप मोठी वाटते.

दोन रुपये नसल्यामुळे क्रिकेट संघात भाग न घेऊ शकलेले अमिताभ आज करोडो रुपयांचे मलिक आहेत.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here