अमिताभ

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अमिताभ यांचा ‘हा’ हमशक्ल कोरोनाग्रस्त रूग्णांशी साधतोय संवाद; मिमिक्रीच्या माध्यमातून रुग्णांना देतात पॉझिटिव्ह एनर्जी


बॉलिवूड स्टार्सच्या हमशक्लची छायाचित्रे बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतापर्यंत कितीतरी स्टार्सचे हमशक्ल समोर आले आहेत. त्यांना पाहून, आपल्यास खरे आणि बनावट स्टार्स ओळखणे फार कठीण आहे. दरम्यान, आता बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा हमशक्ल चर्चेत अाला अाहे. बिग बीच्या या हमशक्लचे नाव शशिकांत पेडवाल आहे जे की, आजकाल आपल्या गमतीशीर आणि कॉमिक स्टाईलमुळे बरेच चर्चेत आहेत. त्यांच्या चर्चेमध्ये येण्यामागील आणखी एक विशेष कारण आहे.

अमिताभ

अमिताभ बच्चनसारखे दिसणारे शशिकांत पेडवाल कोरोना काळात भयंकर साथीचा सामना करत असलेल्या लोकांमध्ये ते कॉमेडीच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा पसरवताना दिसत अाहेत. ते व्हिडिओ कॉलद्वारे लोकांशी बोलून त्यांचे मनोरंजन करीत आहेत. वर्चुअल इंटरेक्शन दरम्यान, पेडवाल लोकांशी अमिताभ बच्चन यांचे संवाद, त्यांच्या कविता सादर करून लोकांना प्रेरित करतात. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांची स्टाईल बिग बी सारखीच आहे. त्याची उंची, बोलण्याची आणि केसांची शैलीदेखील अमिताभ यांच्याशी मिळती जुळती अाहे.

शशिकांत यांना पाहून प्रत्येकजण त्यांना बिग बीची कार्बन कॉपी मानतो. मूळचे पुण्यातील असलेले शशिकांत हे गेल्या 12 वर्षांपासून स्टेजवर अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करत अाहेत. आजकाल या साथीची काळात ते जी कामे करत आहेत, त्यामुळे रुग्णांना तणावातून बराच दिलासा मिळाला आहे. ते हे काम निस्वार्थपणे करीत आहे. शशिकांत यांनी आतापर्यंत 350 कोविड रुग्णांशी बोलले आहेत. ते पेशाने प्राध्यापक असून शासकीय तंत्रज्ञान संस्था आयटीआयमध्ये शिकवित आहेत. त्यांचे अमिताभच्या गेटअपमध्ये कोविड रूग्णांशी बोलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महाविद्यालयीन जीवनापासून करतात मिमिक्री

अमिताभ

शशिकांत म्हणतात की, रूग्णांशी बोलून, त्याच्यात उत्साह भरुन, तणावमुक्त करून मला खूप चांगले वाटते. यामुळे मनाला आनंद मिळतो. अातापर्यंत देश-विदेशातील अनेक टी.व्ही कार्यक्रमांमध्ये भाग घेतला अाहे. मी कॉलेजमध्ये शिकत होतो, तेव्हा सर्व मित्र मला अमिताभचा हमशक्ल म्हणायचे. मग पुढे कॉलेजच्या कार्यक्रमात मी अमिताभ बच्चन यांचे काही संवाद सादर करायचो. कोरोना महामारीपूर्वी मी एनजीअो आणि रुग्णालयात भेट देऊन लोकांचे मनोरंजन करत होतो. यापूर्वी मी कर्करोगाच्या रुग्णांना भेटत होतो. बच्चन यांच्या गेटअपमध्ये असे काम करतोय तेव्हा रुग्णांना खूप आनंद होत आहे.

महानायकाला दोनदा भेटण्याची मिळाली संधी

शशिकांत हे अमिताभ बच्चन यांच्या हावभावाची कॉपी करतात आणि नेहमीच त्यांच्या वेशभूषेत दिसण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्यासारखा चष्मा देखील घालतात. २०११ मध्ये प्रथमच त्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळाली. आतापर्यंत दोनदा सुपरहिरोशी त्यांची भेट झाली आहे. अमिताभ यांच्या घरी पहिल्यांदा शशिकांतने त्यांच्या छायाचित्रांचा अल्बम त्यांना दाखविला. नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘झुंड’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शशिकांत यांना अमिताभ यांना दुसर्‍यांदा भेटण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांना बिग बीच्या लाँग शॉट्समध्ये काम करण्याची संधीही मिळाली.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here