जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील निर्माता बनली आहे. तीने मुंबईत स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले आहे.

याबाबतची माहिती आलियाने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून, तिच्या प्रोडक्शन कंपनीचे काही फोटो आणि पोस्टर्सद्वारे शेअर केली आहे. आलियाने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव ‘इटरनल सनशाईन’ असे लिहिले आहे.

आलियाने हे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, “आमचे प्रॉडक्शन हाऊस ‘इटरनल सनशाईन प्रोडक्शन्स’ ची घोषणा करण्यास मला खूप आनंद होत आहे.ती म्हणते आम्ही तुम्हाला कथा सांगतो, हॅपी किस्से, उबदार आणि अस्पष्ट किस्से, वास्तविक कथा, टाईमलेस किस्से. आलिया आता लवकरच अभिनयाबरोबरच चित्रपटांची निर्मिती करताना दिसणार आहे.

अलिया

आलियाच्या पोस्टवर भाष्य करताना तिची आई सोनी रझदान यांनी लिहिले, “अभिनंदन, सुपर डुपर प्राऊड.” सोनी व्यतिरिक्त करण जोहर, अपूर्व मेहता, रकुलप्रीत सिंग यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी भाष्य केले असून आनंद आणि शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तीचे प्रॉडक्शन हाऊस कार्यालय मुंबईतील जुहू भागात आहे. आलियाच्या या ऑफिसची रचना रूपिन पॉईंटर यांनी केली आहे. रुपिनने २ जून २०२० रोजी आलियाच्या जबरदस्त ऑफिसचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

आलियाने २०१९ मध्ये आधीच आलियाने सांगितले होते की ती लवकरच स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस उघडेल. तीच्या प्रॉडक्शन हाऊसचे पोस्टर खूप मजेदार आहे. या पिवळ्या रंगाच्या पोस्टरमध्ये 2 मांजरी दिसत आहेत. आलियाला स्वत: मांजरी आवडतात म्हणून तिने पोस्टरमध्येही मांजरींचा समावेश केला आहे.

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here