जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अभिमानास्पद! अक्षय इंडीकर ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक; कॅनडाच्या ओआयएफएफए 2021 अवॉर्डमध्ये सोलापूरचा डंका!

कॅनडाची राजधानी असलेल्या ओटावा येथील ‘ओटावा इंडियन फिल्म फेस्टिवल’ अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड सोलापूरच्या अक्षय इंडीकर यांना मिळाला आहे. या पुरस्कारसोबतच स्थलपुराण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार नील देशमुख या बालकलाकारास मिळाला आहे. अक्षयला मिळालेला हा बहुमान भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे. या यशाचे श्रेय त्याने त्याच्या टीमला दिले आहे.

Akshay Indikar dreams in Marathi: 'I believe I can reach out to audiences  with films made in my mother tongue'-Entertainment News , Firstpost

मूळचा सोलापुरचा असलेल्या अक्षयने चित्रपटसृष्टीतील पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मंच गाजवला आहे. त्यामुळे अक्षय इंडीकर हे नाव चित्रपट सृष्टीसह सिनेरसिकांना आता चांगलेच परिचित झाले आहेत. त्याची मराठीतील पहिली डॉक्यु-फिक्शन फिल्म ‘उदाहरणार्थ नेमाडे’ असो किंवा ‘त्रिज्या’ तसेच ‘स्थलपुराण’सारखे दर्जेदार चित्रपट असोत. अक्षयच्या या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे.

यामध्ये ‘त्रिज्या’ सिनेमाला ‘बेस्ट साउंड डिजाईन’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अशियाई चित्रपट आणि बेस्ट भारतीय दिग्दर्शक असे दोन मोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ख्याती असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार देखील अक्षय इंडीकरला मिळालेला आहे.

Advertisement -

काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप हे स्वतः अक्षय इंडीकरची मुलाखत घेऊन त्याचा आतापर्यंचा प्रवास उलगडला आहे. यामुळे अक्षयला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठीच नव्हे तर अवघ्या भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे. अनेक संघर्षातून घडून आता इतर धडपड्या कलाकार, दिग्दर्शकांना नेहमीच मदत करणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप हे स्वतः अक्षयची मुलाखत घेत घेतल्याने हे मराठी चित्रपट आणि एकूणच तरुण दिग्दर्शक यांच्यासाठी दिशादर्शक ठरणारे आहे.

अक्षय इंडीकर

मराठी सिनेमाच्या सन्मानात भर

दरम्यान, ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या वेगळ्या धाटणीच्या डॉक्यु-फिक्शन फिल्मपासून आपल्या चित्रपट कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात करणारा अक्षय इंडीकर, आपल्या स्वतंत्र आणि अनोख्या चित्रपट शैलीमुळे जगभरात नावाजला गेला आहे. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ख्याती असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार देखील अक्षयला मिळालेला आहे. त्यातच आता ‘लॉस एंजेलिस इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये अक्षयच्या फिल्मचा समावेश झाल्याने अक्षयच्या आणि एकंदरीत मराठी सिनेमाच्या सन्मानात भर पडली आहे.

मराठी सिनेमा विदेशात घेऊन जाता आल्याने आनंद

भाषेतील प्रदेशिकतेची बंधने ओलांडून मराठी सिनेमा महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या बाहेर घेऊन जाता आले याचा विशेष आनंद होत अाहे. सिनेमालाभाषा नसते तर सिनेमा हीच त्यांची भाषा असते, अशी प्रतिक्रिया अक्षय ने दिली अाहे.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

भिजलेल्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here