शेतीबरोबरच हे करा साइड बिजनेस होईल बक्कळ फायदा

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. येथील सुमारे 90 टक्के जनता ही शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करते.

शेतकरी शेतात दिवसभर कष्ट करून उत्पन्न मिळवत असतो. परंतु योग्य भाव पिकाला मिळत नसल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत येत आहे. त्यामुळं शेतकरी शेतीबरोबरच अनेक वेगवेगळे जोडव्यवसाय करून आपली उपजीविका करत आहेत.
तर चला तर जाणून घेऊया कोणकोणते व्यवसाय आपण शेतीबरोबरच करू शकतो.

साइड बिजनेस
साइड बिजनेस

1) दुघव्यवसाय:- प्रत्येक शेतकरी शेतीबरोबर पशुपालन करत असतो त्यातून तो दुधव्यवसाय करून बक्कळ फायदा कमवत आहे. याबरोबर दुधापासून नवनवीन उत्पादने बनवून आणि पॅक करून सुद्धा मोठया प्रमाणात पैसे कमवू शकतो.

Advertisement -

2) विविध जातीच्या शेळ्यांचा मुक्त गोठा:- देशी शेळी पालनातून जास्त प्रमाणात उत्पन्न सुद्धा मिळत नाही. याउलट जर तुम्ही बोअर, बिटल जातीच्या शेळ्यांचे पालन केले तर त्यातून अधिक फायदा मिळेल. देशी शेळी ही 1 लिटर ते 1.5 लिटर दुध देते परंतु बिटल आणि बोअर जातीच्या शेळ्या दिवसाला 3 लिटर दुध देतात. आणि त्यांच्या पिल्लांची वाढ सुदधा झपाट्याने होते.

3)मत्स्यव्यवसाय:- मत्स्यव्यवसाय हा बक्कळ नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. शेतामध्ये शेततळे खणून किंवा विहरीमध्ये पिल्लांचे संगोपन करून केवळ 3 महिना तिप्पट नफा आपण मत्स्यव्यवसायातून कमवू शकतो.

4) पोल्ट्री फार्मिंग:- पोल्ट्री फार्मिंग करून महिन्याला आपण 70 ते 80 हजार रुपये अगदी सहजपणे कमवू शकतो. यामध्ये कावेरी, डीपी क्रॉस, ब्रॉयलर या पक्ष्यांचे पालन करावे. सोबत अंड्यांची सुद्धा विक्री करून पैसे कमवू शकतो.

5)मांसल व्यवसाय:- मांसल व्यवसाय हा एक व्यापारी व्यवसाय आहे. यात शेतकरी वर्ग बकरी, बोकड यांच्या मटणाचे वितरण करतो त्यातून त्याला योग्य नफा मिळत आहे. लहान बोकड सांभाळून मोठे करून त्याचे मटण स्वतः विकणे आणि पैसे मिळवणे.

अश्या प्रकारची नविन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला लाइक करा कमेंट करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेयर करा.

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here