आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या माणसाला होते दोन चेहरे, दुसरा चेहरा पाहून भीत असायचे लोक ज्यामुळे शेवटी त्याला करावी लागली आत्महत्या ….


जगातील काही न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक म्हणजे एडवर्ड मॉर्डरेक आणि त्याचा चेहरा.  या माणसाची कहाणी ऐकून प्रत्येकाला नक्कीच आश्चर्य वाटेल. दुतर्फा चेहरा असलेली ही रहस्यमय व्यक्ती विज्ञानासाठीही आव्हान बनली होती.

19व्या शतकात इंग्लंडमध्ये जन्मलेल्या या व्यक्तीचा चेहरा समोरून जितका सुंदर होता तितकाच तो दुसऱ्या बाजूने भीतिदायक होता. आपण अनेक लोक पाहिले असतील ज्यांना दोन डोके आहेत परंतु एडवर्डला दोन चेहरे होते दुसरा चेहरा जो डोक्याच्या मागील बाजूस होता.

समोरच्या चेहऱ्याप्रमाणे या चेहऱ्यालाही डोळे, नाक आणि तोंड होते. फरक एवढाच होता की हा चेहरा काहीच बोलू शकत नव्हता, फक्त जेव्हा एडवर्ड हसला आणि रडला तेव्हा तो चेहरा देखील हसायचा आणि रडायचा.

चेहरे

Advertisement -

एडवर्डला त्याच्या दुसऱ्या चेहऱ्यामुळे अनेक लोकांचा त्रास सहन करावा लागला. शिवाय त्याच्या भीतीदायक चेहऱ्यामुळे  लोकांना त्याची भीतीसुद्धा वाटायची. हा भितीदायक चेहरा काढण्यासाठी एडवर्डने अनेक डॉक्टरांशी संपर्क साधला मात्र कोणीही हा चेहरा काढू शकला नाही.

शेवटी, एडवर्डनेही या भीतीदायक जीवनाचा त्याग केला आणि वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आत्महत्या करून या क्रूर जीवनातून सुटका मिळवली. त्याचा चेहरा शेवटपर्यंत तसाच राहिला होता.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here