आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

====

वयाच्या ४६ व्या वर्षी प्रीती झिंटा बनली दोन लेकरांची माय, सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती..!


90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी प्रीती झिंटा कदाचित आता मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार नाही. पण रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने  ती चर्चेत येतच असते आता अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

वयाच्या ४६ व्या वर्षी प्रीती झिंटा जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रीती झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबद्दल सांगितले आहे. प्रिती झिंटाने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंद नाचा वर्षाव सुरू झाला आहेप्रीती झिंटा.

प्रिती झिंटाने पती जीन गुडनेफसोबतचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने जुळ्या मुलांशी संबंधित गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रिती झिंटाची जुळी मुले एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. प्रीतीने मुलीचे नाव जिया गुडनफ ठेवले असून मुलाचे नाव जय गुडनफ ठेवले आहे. प्रीती झिंटा सरोगसीच्या माध्यमातून आई बनल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तरीही अद्याप तिच्या पोस्टमध्येअभिनेत्रीने याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

तिची पोस्ट शेअर करताना प्रिती झिंटाने कॅप्शनमध्ये लिहिले  सर्वांना नमस्कार, मला तुमच्यासोबत एक चांगली बातमी शेअर करायची आहे. मी आणि जीनला खूप आनंद झाला आहे आणि इतक्या प्रेमामुळे आमचे अंतःकरण कृतज्ञतेने भरले आहे कारण आज आम्ही आमच्या कुटुंबात जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडनफ या जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे.


===

Advertisement -

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here