जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा

===

1957च्या क्रांतीबद्दल मी संशोधन केले; माझी चूक सिद्ध करून दाखवा मी पद्मश्री पुरस्कार वापस करेल,कंगना राणावत पुन्हा बरळली…!


अभिनेत्री कंगना रनौत आणि वाद यांचं तसं खूप घट्ट नातं आहे. असे वाटते की, दोघेही एकमेकांना पूरक आहेत. नुकतेच कंगनाने स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर राजकीय पक्षांसह सोशल मीडियावरही अनेकांनी तिला बोल लगावले आहे. मात्र, आता अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकून आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

टाइम नाऊला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली होती की, आपल्याला भीक मागून स्वातंत्र्य मिळाले आहे. तेव्हापासून बरेच वाद निर्माण झाले आहेत. तिच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. इतकेच नाही तर, तिच्याविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा, असे अनेक राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.

कंगना राणावत

सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कंगनाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक स्टोरी टाकून तिच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तिने लिहिले आहे की, ‘1947 मध्ये नेमके काय घडले, हे कोणी सांगितल्यास ती पद्मश्री पुरस्कार परत करेल.’ तिने एका कात्रणाचा फोटो टाकून लिहिले आहे की, सर्व काही अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे. 1857मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहीत आहे, पण 1947 मध्ये  कोणती लढाई झाली हे मला माहिती नाही.’

Advertisement -

1857च्या क्रांतीबद्दल मी संशोधन केले!

कंगनाने पुढे लिहिले की, ‘मी राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील चित्रपटात काम केले आहे. 1857 च्या क्रांतीवर बरेच संशोधन झाले आहे. राष्ट्रवादाबरोबरच उजव्या विचारसरणीचाही उदय झाला, पण तो अचानक लुप्त कसा झाला? आणि गांधींनी भगत सिंहांना का मरू दिले? इंग्रजांनी फाळणी रेषेवर काढलेले स्वातंत्र्य साजरे करण्याऐवजी भारतीय एकमेकांना का मारत होते? मला या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, ज्यासाठी मला मदत हवी आहे.

2014 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे तिने याच मुलाखतीदरम्यान सांगितले होते. तेव्हापासून सर्व राजकीय पक्ष कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध करत आहेत. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि शिवसेना या पक्षांकडून करण्यात येत आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here