जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

अभिनेत्री कंगना राणावतला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल…


अनेकदा वादात राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात गुन्हा दाखल केला आहे. कंगनाने मनालीतील दोन लोकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी या प्रकरणी मनाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मनप्रीत नावाच्या व्यक्तीने कंगनाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही व्यक्ती कुठली आहे हे तक्रारीत सांगितले नसून नाव देऊन तक्रार नोंदवण्यात आली आहे.

माहितीनुसार, मनाली पोलिसांनी आयपीसी कायदा 1860 अंतर्गत कलम 295A 505(2) 504 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एसपी कुलू गुरदेव शर्मा यांनी सांगितले की, अभिनेत्री कंगना राणौतने मनप्रीत नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर तिला धमकी दिल्याचा आरोप केला आहे आणि कंगनाच्या तक्रारीवरून मनाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

कंगना राणावत

Advertisement -

काय आहे प्रकरण?

एसपी कुल्लू यांनी सांगितले की, कंगना रणौतने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यावर एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. तो म्हणाला की कंगना राणौतला वाय प्लस सुरक्षा आहे आणि कुल्लू पोलिसांनी कंगना राणौतला सुरक्षा देखील दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here