जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस अडचणीत, 52 लाखांचा घोडा पडणार महागात, होऊ शकते अटक..


 

२०० कोटींची उधळपट्टी करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. आज संध्याकाळी दुबईला निघालेल्या जॅकलिन फर्नांडिसला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई विमानतळावर रोखले.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ईडीने जॅकलीनविरुद्ध लुक आउट सर्क्युलर (एलओसी) जारी केले होते. जॅकलिन एका शोसाठी परदेशात जाणार होती, मात्र तिला देशाबाहेर जाण्यास नकार देण्यात आला होता. मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणात ईडीने दोनदा चौकशी केली आहे.

52 लाखांचा घोडा दिला भेट  

जैकलीन

Advertisement -

ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन या वर्षी जानेवारीमध्ये एकमेकांच्या संपर्कात आले होते. सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांची भेटवस्तू दिल्या. यात BMW कारसह 52 लाखांचा अरेबियन घोडा, 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरी, फोन, दागिने याशिवाय बरीच रक्कम जॅकलिनच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. एवढेच नाही तर सुकेशने जॅकलीनच्या भावंडांनाही मोठी रक्कम पाठवली होती.

जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये जॅकलीन सुकेशच्या गालावर किस करत आहे. यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. हा फोटो एप्रिल ते जून दरम्यानचा आहे, त्यावेळी सुकेश अंतरिम जामिनावर तिहारमधून बाहेर आला होता.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here