जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

कधी सुरक्षारक्षकाची नोकरी करणारा नवाजुद्दीन सिद्धकी  असा बनला बॉलीवूडचा स्टार अभिनेता…


बॉलीवूड मध्ये सारखे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्याच्या कष्टा मधून स्वतःची रचना बनवली आहे असाच एक कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी स्वतःच्या कष्टानी आणि समर्पणा मुळे  आज त्यांची  गणना  बॉलीवूड  मधील  आघाडीच्या  अभिनेत्यांमध्ये केली जाते.

वर्षे १९९९ मध्ये  शूल चित्रपटामध्ये  वेटर आणि  सरफोरोश  चित्रपटात माहिती देणाऱ्याची  भूमिका  साकारणारा  नवाजुद्दीन सिद्धकी  आज बॉलीवूड स्टार बनला आहे ज्यांच्या चार चित्रपटांना एकाच वेळी राष्टीय पुरस्काराने सन्मानित करण्यात  आले आहे २०१२ मध्ये तलाश कहाणी आणि गँग्स ऑफ वासेपूर १-२ या चित्रपटांसाठी राष्टीय  पुरस्कार  देण्यात  आला .

१९ मे १९७४ रोजी जन्मलेला नवाजुद्दीन सिद्दीकी हा उत्तर प्रदेशांतील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा या छोट्याशा गावांतील  शेतकरी कुटुंबातील आहे नवजाने हरीद्वारच्या गुरुकुल कांगरी युनिव्हर्सिटी मधून विज्ञान मध्ये पदवी घेतली आहे नवाजुद्दीन सिद्धकीचे खरे नाव नंबरदार नवाजुद्दीन सिद्धकी आहे शिक्षणानंतर नवाजने गुजरातमधील वडोदरा येथे जवळपास एक वर्ष केमिस्ट म्हणून काम केले.

एकदा त्यांच्या सोबत काम करणारा त्यांच्या मित्र त्याला नाटक दाखवायला रंगमच्यामध्ये घेऊन गेला नाटक पहिल्या नंतरच त्यांनी  अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ते दिल्लीत आले.

Advertisement -

अभिनय शिकण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रॅमा (NSD)  हे जगातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते परंतु येथे प्रवेश घेण्यासाठी काही नाटकाचा अनुभव आवश्यक आहे त्यासाठी  नवाज साक्षी नाट्यसमूह गटा मध्ये सामील झाला होता जिथे मनोज बाजपेयी आणि सौरव शुक्ला सारखे कलाकार देखील अभिनयाच्या युक्त्या शिकत होते

एका मुलाखतीदरम्यान नावाजने सांगितले होते कि एकेकाळी नवाज दिल्लीत टिकून राहण्यासाठी नोकरीच्या शोधात होता तेव्हा एके दिवशी त्याला सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर एक पोस्टर चिटकवलेले दिसले ज्यावर सुरक्षा रक्षकाची गरज असल्याचे लिहले होते नावाजने त्यांच्याशी संपर्क साधला आणि एका खेळण्यांचा कारखान्यात पहारेकरी ची नोकरी केली त्यासाठी त्याला माहिन्याला ५०० मिळायचे.

या नोकरीत त्याला बहुतेक उन्हा मध्ये उभं रहावं लागायचं तर कधी सावलीत जाऊन विश्रांती करायला बसायचा  योगायोगाने कंपनीचे मालकही त्याच वेळी यायचे असे अनेकवेळा घडल्यानंतर कंपनीच्या मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते आणि नोकरीवर रुजू  होताना नावाजने सुरक्षा ठेव म्हणून जमा केलेले पैसेही त्याला परत दिले नव्हते.

नवाजुद्दीन सिद्दीकी

NSD मधून अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर नवाजने सुमारे ४ वर्षे दिल्लीतील अनेक चित्रपटगृहांमध्ये नाटकांचे काम केले परंतु या सगळ्यासाठी त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे मिळाले नाहीत त्यांनतर २००० मध्ये त्यांनी मुंबईत पाऊल ठेवले.

मुंबईत नवाजला त्याच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल या अटीवर वरिष्ठानी सहमती दिली असली तरीही त्याने एनएसडीच्या एका वरिष्ठाकडे मदत मागितली नवाजननेही यासाठी होकार दिला अनेक धक्के आणि निराशेनंतर नवाजला अमीर खानच्या सरफरोश चित्रपटात आयुष्यातील पहिला ब्रेक मिळाला ज्यामध्ये त्याचे पात्र फक्त ४० सेकंद होते या चित्रपटात तो एका क्षुद्र गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसला होता ज्याला पोलिसानी पकडले आणि त्यांची चौकशी केली.

नवाजने कधी चोर कधी वेटर तर कधी भिकाऱ्यांची भूमिका साकारली आहे एकदा त्याने सचिन तेंडूलकरच्या सचिन आला रे या जाहिरातीला धुलाई ची भूमिका देखील केली होती ज्यासाठी त्याला ५०० रुपये देण्यात आले होते.

हे अनेक वर्षे चालेले वैतागून नवाजने गावी परत जाण्याचा विचार केला पण मग मी परत गेलो तरी गावकरी टोमणे मारतील आता जे होईल ते मुंबईतच होईल असे त्याला वाटू लागले होते.

त्यांची मेहनत आणि धाडस कामी आले आणि २०१० मध्ये त्यांना पीपली लाईव्ह चित्रपटात पत्रकाराची महत्वाची भूमिका देण्यात आली या चित्रपटाने त्यांना अभिनेता म्हणून ओळख दिली त्यांनतर त्याने कधीच  मागे वळून पहिले नाही आणि कहाणी गँग्स ऑफ वासेपूर १-२ तलाश द लाच बॉक्स किक बदलापूर बजरंगी भाईजान माझी यासारखी सिंगल प्रोड्युस केले एकापेक्षा जास्त चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

मित्रानो जर तुम्हाला आमची ही महिती आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि त्याबद्दल तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .


हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here