परश्या

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

जाळ अन धूर संगटच, परश्याची पिळदार बॉडी पाहून पोरी झाल्या पागल, पहा फोटो..


प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटातून मुख्य नायक आकाश ठोसर उर्फ परशा घरोघरी पोहचला. मराठी पडद्यावर इतिहास घडवणार्‍या या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई देखील केली. नायकाच्या मुख्य भूमिकेत असलेल्या आकाश ठोसरने या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये दमदार पदार्पण केले. नुकतेच त्याने तालमीत आणि जिममध्ये जाऊन तासन्तास व्यायाम करुन पिळदार शरीरयष्टी बनवली आहे. नव्या लूकचा फोटो त्याने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्याचा हा नवा लूक चाहत्यांना पसंतीस आला असून अनेक जण कमेंट्स करत आहेत.

नव्या फोटोमध्ये अाकाशची शरीरयष्टी भारदस्त दिसत आहे. नेहमी सोशल मिडीयात अॅक्टिव्ह असलेल्या आकाशचे व्यायामावरील प्रेम हे सर्वश्रुत. तो व्यायाम करत असतानाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. लहानपणीच त्याला कळत-नकळत लाल मातीचा लळा लागला. वडिलांच्या आणि त्याच्या हौशेपोटी तो तालमीत जातो. गेल्या ५ वर्षांपासून तो तालमीत जोर, बैठका मारत दणकट शरीरयष्टी बनवली आहे. चित्रपटात येण्यापूर्वी देखील तो तालमीत जाऊन व्यायाम करायचा. मात्र सैराट चित्रपटासाठी एका महिन्यात चक्क १३ किलोचे वजन कमी केले होते. या चित्रपटात तो खूपच ‘स्लीम’ दिसत होता.

सैराट

वास्तविक पाहता अाकाश अभिनयाच्या क्षेत्रात ठरवून आला नाही. नागराज मंजुळे यांच्या भावाने एकदा त्याला रेल्वे स्टेशनवर पाहिले आणि चित्रपटासाठीचा आॅडिशन देण्यासंदर्भात सांगितले. त्याच्या अभिनयाने नागराज मंजुळे प्रभावित होऊन त्याला सैराट चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका दिली आणि त्याचे स्टार बदलले. आज तो मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. एखादी पोस्ट अथवा फोटो टाकल्यास त्याला चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. इंस्टाग्रामवर त्याचे ४९८k फॉलोव्हर्स आहेत. व्यायामासोबतच त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला अन् फिरायला आवडते.

बिग बी सोबत केली भूमिका

परश्या

अाकाशने ‘सैराट’ चित्रपटा नंतरही आपला अभिनय क्षेत्रातला प्रवास चालू ठेवला. त्याने ‘एफ यू: फ्रेंडशिप अनलिमिटेड’ (२०१७) हा मराठी चित्रपट, ‘लस्ट स्टोरीज’ (२०१८) आणि ‘झुंड’ (२०२०) हे हिंदी चित्रपट, १९६२: द वॉर इन द हिल्स ही वेब सिरीज यामध्ये काम केले आहे. नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ हा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नसला तरी अाकाशची त्याच्या आवडत्या अभिनेत्याबरोबर म्हणजेच अमिताभ बच्चन बरोबर काम करण्याची इच्छा या चित्रपटाने पूर्ण केली आहे.

लाल मातीने दिली ऊर्जा

परशाने त्याच्या इंस्टाग्राम वरील पोस्टमध्ये लिहिले की,  लाल मातीच्या स्पर्शात एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा आहे आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आलो. या लाल मातीचा आणि माझ्या गुरुजनांचा, पैलवान मित्रांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्याचाच उपयोग आज मला या कला क्षेत्रात होतोय. या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला या मातीत रुजायला, खेळायला आणि लढायला शिकवलं, त्या सर्व माझ्या मातीतल्या माणसांना प्रणाम आणि धन्यवाद!

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here