जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

अभिनेता अमीर खान तिसऱ्या लग्नाच्या तयारीत ,मात्र जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा होताहेत ती वेगळच काय सांगतेय..


बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या तिसर्‍या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमिर खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर अशा बातम्या पसरत होत्या की, आमिर खान त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या नंतर  तिसऱ्या लग्नात अडकण्याच्या   तयारीत आहे..

त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिलमध्ये आमिर आपल्या चाहत्यांना लग्नाची माहिती देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकांचे म्हणणे आहे की अभिनेत्याला त्याच्या आगामी चित्रपटाबाबत कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे, त्यामुळे तो सध्या लग्नाची घोषणा करत नाहीये.

आमिर खान

त्यामुळे तिकडे बघितले तर या सगळ्या गोष्टींबाबत एक ट्विस्ट दिसला. किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतर प्रत्येक वेळी या अभिनेत्याचे नाव फातिमा सना शेखसोबत जोडले गेले. फातिमासोबत त्याच्या लग्नाच्या अफवाही जोरात पसरत आहेत. ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांमध्ये फातिमा आमिरसोबत दिसली होती, तेव्हापासून आमिर आणि फातिमा सना शेख एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. आणि लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.

Advertisement -

मात्र, जेव्हा जेव्हा अभिनेत्री तिच्याबद्दल आणि आमिरबद्दल बोलली गेली तेव्हा तिने हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचं म्हणत फेटाळून लावले. फातिमाने काही दिवसांपूर्वी तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, हे सर्व माझ्यासाठी खूप विचित्र होते, जेव्हाही माझी आई हे सर्व टीव्हीवर पाहायची तेव्हा तिला खूप वाईट वाटायचे.

न्यूजपेपरमध्ये माझा फोटो यायचा तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा, पण हेडलाईन ऐकून तिचा चेहरा उदास व्हायचा. माझ्याबद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मी पण डिप्रेशन मध्ये जायचो. त्यानंतर मी विचार केला की मी माझे म्हणणे सर्वांसमोर ठेवावे. आणि या सर्व अफवा आहेत असे प्रत्येकाने म्हणायला हवे.

बोलणे हे जनतेचे काम आहे, ते बोलतील असेही फातिमा म्हणाल्या. त्यांना कोणीही रोखू शकत नाही, माझी चूक नाही हे मला माहीत आहे, त्यामुळे मी या सर्व गोष्टींपासून मागे हटणार नाही.


==

आमचे नवनवीन लेख

वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here