जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अनोखी परंपरा! या गावात, मुली स्वतःची वरात घेऊन जातात मुलाच्या घरी.!


समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग आज आपण एक लग्नाशी संबंधित असलेली परंपरा जाणून घेऊया.

लग्नाची वरात
लग्नाची वरात

छत्तीसगढ येथील अबुझमाड येथे राहणारी माडिया जातीची संस्कृती अजूनही अस्तित्वात आहे. येथिल लोकांच्या विविध परंपरा आहेत. त्यातील प्रसिद्ध अशी लग्न परंपरा. यांच्या परंपरेनुसार नवरी मुलगी लग्नाची वरात घेऊन नवऱ्या मुलाच्या घरी जाते.

अबुझमाड येथे आदिवासी लोक मोठ्या संख्येने राहतात. हे लोक उंच डोंगर ,घनदाट वन, आणि खळखळ वाहणाऱ्या नद्या आशा ठिकाणी आपली घरे करून राहतात. भारत सरकारद्वारे विशेष रूपाने संरक्षित असणारे हे माडिया जातीचे लोक यांनी आजही त्यांची संस्कृती आणि परंपरा जपली आहे.

आताच्या संस्कृती नुसार या जातीमधील लोकांना दोन उपजातीमध्ये विभागले आहे , अबुझमाडिया व बायसन हार्न माडिया. अबुझमाडिया या जातीचे लोक आपल्याला उंच डोंगराळ भागात आढळून येतात तर बायसन हार्न माडिया याजातीचे लोक आपल्याला इंद्रावती नदीच्या किनारी राहत असलेले आढळून येतात.

Advertisement -

मुली

बायसन हार्न माडिया हे नाव पडण्यामागे कारण आहे ते म्हणजे त्या जातीचे लोक त्यांचे पारंपरिक नृत्य करताना बायसनचे शिंग लावून नाचत असत.तस पाहायला गेलं तर या उपजातींमध्ये फारसा फरक नाही.अबुझमाडिया या जमातीच्या लोकांबद्दल नेहमी परंपरा आणि वैवाहिक शिक्षा यांवर चर्चा होत असते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here