जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

मतिमंद मुलांच्या पंखांना या दाम्पत्याने ‘आधार’चे बळ दिलंय..!


लहान मुले ही देवाघरची फुले असे म्हटले जाते. ती साऱ्यांनाच प्रिय असतात. त्यांचे कौतुकही तितकेच केले जाते. मात्र मतिमंदांच्या आयुष्यात असे कौतुकाचे दिवस येत नाहीत. मतिमंद मुलांना सांभाळणे ही जणू तारेवरची कसरत असते.  त्यांचा सांभाळ करताना पालकांची होणारी ओढाताण, कष्ट व त्रास समजून घेऊन अशा मुलांच्या आयुष्याची जबाबदारी घेऊन त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्याचे एक दाम्पत्य करतंय. जगदीश कलकेरी आणि शुभांगी कलकेरी असं या दाम्पत्याचे नाव आहे.

जगदीश कलकेरी हे महाविद्यालयीन जीवनापासून पुरोगामी चळवळीत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे. दरम्यान मतिमंद मुलांच्या आयुष्यात होणारी परवड त्यांना दिसून आली. या मुलासंदर्भात काहीतरी काम करण्याची संकल्पना सुचली. कुंभारी येथे सन २००९ साली त्यांनी आधार मागासवर्गीय महिला संस्था संचलित आधार मतिमंद निवासी शाळा उभारली. आज ६५ मतिमंद मुलांना आपल्या पंखाखाली घेत त्यांच्या आयुष्यात एक आशेचा किरण त्यांनी दाखविला. या कामी त्यांच्या पत्नी शुभांगी कलकेरी या मदत करतात

जगदीश कलकेरी सांगतात, मतिमंद मुलांना शिकवताना कमालीचा संयम आवश्यक आहे. प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो. आज शिकवलेली गोष्ट लगेच विसरतात. त्यामुळे त्यांना पुन्हा-पुन्हा ती शिकवावी लागते. अशावेळी शिकविताना जितका या मुलांचा कस लागतो तितकाच किंबहुना त्याहून अधिकच त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचा लागतो. या मुलांना चांगले शिक्षण देता यावे, यासाठी शुभांगी यांनी बी.एड.चे शिक्षण घेतले स्वत: शिक्षक बनत ही शिकवण्याची अवघड लीलया सहज पार केली.

करकेरी दाम्पत्य ‘अपंग सेवा हीच ईश्वरसेवा’ या संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे मुलांना चांगले संस्काराचे धडे देत अजोड कष्ट करत आहेत. हे काम करत असताना वाटेत अनेक काटे आले. त्या अग्निदिव्यांना पार पाडत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. या मुलांच्या उद्धारासाठी जमीन, सोने विकून शाळा उभारल्याचे कलकेरी सांगतात. मुलांच्या देखभालीसाठी बारा लोक सहाय्यक म्हणून मानधन घेऊन काम करतात. येथील मुलांचे पालनपोषण शैक्षणिक वस्तूंसोबत औषध उपचारही केला जातो. नि:स्वार्थी भावना ठेवून कलकेरी दाम्पत्याने केलेल्या कार्यामुळेच आज अनेक पालकांची झोळी समाधानाने भरली आहे मतिमंद

Advertisement -

स्वावलंबी जीवनाचे देतात धडे

मतिमंद असूनही या मुलांना स्वावलंबी जीवनाचे धडे या शाळेत दिले जातात. केवळ मुलांचा सांभाळ न करता त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना कामे शिकवली जातात. पत्रवळ्या, कागदी पाकिटे, खडू, मेणबत्त्या, कंदील, पणत्या तयार करणे अशी अनेक कामे याठिकाणी मुलांकडून घेतली जातात. यातून तयार होणारी वस्तू बाजारपेठेत विकली जातात. त्यातून मिळणार्‍या  उत्पादनातून मुलांच्या संगोपनाला हातभार लागतो. सध्या मतिमंदांची ही शाळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असून सर्व विद्यार्थी हे घरीच आहे. संस्थेच्या माध्यमातून त्यांना सर्व अन्नधान्याचे कीट पुरवले जातात.

=

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here