जगभरातील महत्वाच्या बातम्या आणि लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यावर रोहित शर्माने पहिल्यांदाच दिली असी प्रतिक्रिया, रोहित बनू शकतो कर्णधार..!


टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या फॉर्मेटचा उपकर्णधार रोहित शर्माला राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकाविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘याबाबत अधिकृत घोषणा झाली आहे का? मला याबद्दल माहिती नाही?

रोहित म्हणाला, ‘राहुल द्रविड वेगळ्या जबाबदारीसह भारतीय संघात पुनरागमन करत आहे आणि त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांच्यासोबत काम करायला आम्ही खूप उत्सुक आहोत. ते भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू आहेत  आणि भविष्यात त्यांच्यासोबत काम करणं खूप छान असेल.

तत्पूर्वी, द्रविडने त्यांच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीबद्दल असेही म्हटले होते की, ‘भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त होणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे आणि मी या भूमिकेसाठी उत्सुक होतो.

 

Advertisement -

मुख्य प्रशिक्षक या नात्याने शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली संघाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे आणि मला आशा आहे की ते पुढे नेण्यासाठी संघासोबत काम करत राहिल.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 210 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावाच करू शकला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली .

रोहितने 74 आणि राहुलने 69 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने २७ आणि हार्दिक पंड्याने ३५ धावांची छोटी पण उत्कृष्ट खेळी केली होती.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here