आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या विमान अपघातात वाचलेले लोक 72 दिवस मेलेल्या व्यक्तींचे मांस खाऊन जगत होते…


कित्येक तासांचा प्रवास विमानांनी मिनिटांत पूर्ण केला जातो. पण, याच्याशी संबंधित एक मोठे सत्य देखील आहे की, जेव्हा विमान अपघात होतो तेव्हा व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. इतिहासात असे अनेक मोठे विमान अपघात झाले आहेत, ज्यात बसलेल्या सर्व किंवा बहुतांश प्रवाशांना मृत्यूला कवटाळावे लागले आहे. असे काही अपघातही आहेत, जे त्यांच्या काही विचित्र घटनांमुळे खूप चर्चेत राहिले आणि इतिहासाच्या पानात वेगळे नाव नोंदवले गेले. आम्ही तुम्हाला अशाच एका विमान अपघाताबद्दल सांगणार आहोत.

हा विमान अपघात उरुग्वे एअर फोर्स फ्लाइट ५७१ शी संबंधित आहे ज्याला ‘मिरॅकल फ्लाइट ५७१’ असेही म्हणतात. विमान उरुग्वेच्या मॉन्टेव्हिडिओ येथून चिलीतील सॅंटियागोला जात असताना विमान अपघात झाला. त्याच्या उड्डाण दरम्यान, हे विमान अँडीज पर्वतांमध्ये (अर्जेंटिना) कोसळले. ती तारीख होती 13 ऑक्टोबर 1972 आणि वेळ होती दुपारी 3.30 ची.

विमान

खराब हवामानामुळे, असे मानले जाते की फेअरचाइल्ड FH-227D च्या सह-वैमानिकाने चुकीचे अनुमान गृहित धरले की, त्यांचे विमान कोणत्याही यांत्रिक रीडिंगशिवाय क्युरिकोला पोहोचले आहे. यानंतर, सॅंटियागो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच, विमान वेगाने खाली आणले जाऊ लागले आणि चिलीच्या सीमेजवळील अर्जेंटिनाच्या खोऱ्यात ते आदळले.

Advertisement -

 

हा अपघात इतका भीषण होता की, ते डोंगरावर आदळताच विमानाचे दोन पंख आणि मागचा भाग निकामी होऊन कापला गेला. त्याचवेळी उर्वरित भागही डोंगरावरून खाली पडला. जहाजाचे काही अवशेष समुद्रसपाटीपासून 3,500 मीटर उंचीवर अडकले, जिथे वाचलेल्यां काही प्रवाशांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागला.
तर विमानातील काही प्रवासी डोंगरात पण अडकले. बीबीसीच्या वृत्तानुसार, विमानात 45 लोक होते त्यापैकी निम्मे ठार झाले. त्याचवेळी या दुर्घटनेतून बचावलेले जवळपास ७२ दिवस डोंगरात अडकले होते.

रिपोर्टनुसार, या विमान अपघातात बचावलेल्या १६ जणांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. त्याच वेळी, असे म्हटले जाते की त्या वाचलेल्यांनी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी मृतांचे मांस खाल्ले, कारण जगण्यासाठी खावे असे जे काही अन्न शिल्लक होते ते संपले होते. त्यांनी हे केले नसते तर ते उपासमारीने मरण पावले असते.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here