बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत चा सर्वात जास्त चर्चेत असलेला चित्रपट अर्थातच (thalaivi) आता सिनेमा घरात पोहोचला आहे. हा चित्रपट इतर अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सहद क्रिटिक्स चाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसं तर हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे खूप मागच्या रांगेत आहे, आणि याचं कारण आहे देशात समोर येणारे रोज नवीन कोरूना रुग्ण. कंगना राणावत चा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.44 करोड रुपयांचा कारोबार केला. जिथे की दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने कमालच केली, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 1.64 करोड रुपयांचा गल्ला जमवला. बघायला गेले तर हा इतका मोठा कलेक्शन नाही आहे पण तरीही करोना च्या काळामध्ये इतका गल्ला एका चित्रपटाने कमवून दाखवणं मोठीच गोष्ट आहे.

 

 

थलआयव्ही या चित्रपटाचे आकडे तुम्ही खालील बघू शकता:

 

Advertisement -

 हिंदी : 97 लाख रुपये

 तामिळ : 45 लाख रुपये 

 तेलगू : 22 लाख रुपये

 देशभरात दुसऱ्या दिवसातील कमाई : 1.64 करोड रुपये

 आतापर्यंतची कमाई : 3.08 करोड रुपये

 दोन दिवसातील जगभरात कमाई : 4.83 करोड रुपये.

 

 

 

पण या सर्व गोष्टीत बघायला गेलं तर आतापर्यंत हा चित्रपट महाराष्ट्राच्या सिनेमा घरात रिलीज नाही झालेला आहे. याच सोबत या चित्रपटाला अनेक मल्टिप्लेक्स मध्ये सुद्धा रिलीज करण्यात बंदी आणली आहे, ज्याचा परिणाम या चित्रपटाच्या कमाईवर दिसून येतोय. आणि याच सोबत या चित्रपटाला साउथ इंडस्ट्री मधल्या सिनेमा घरात सुद्धा चांगला प्रतिसाद नाही मिळू शकला याचे कारण असे की कंगना राणावत स्टारर या चित्रपटाचा सोबतच गोपीचंद स्टारर फिल्म सिटी मार ने तगडी टक्कर दिली आहे. तामिळनाडूच्या एक्स सीएम जय ललिता यांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटाला सुद्धा तितका चांगला प्रतिसाद नाही मिळाला जितका अपेक्षित होता. आणि या सर्व गोष्टींना लक्षात ठेवून (thalaivi) या चित्रपटाचे निर्माते लवकरच नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम वर स्ट्रीमिंग सुरू करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here